बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खुशखबर! आता इंजिनीअरिंग मराठीतही करता येणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता

पुणे | शिक्षण क्षेत्रात अवघड अभ्यासक्रम असल्याच्या यादीत इंजिनीअरिंगचा आभ्यासक्रम देखील येतो. त्यात इंजिनीअरिंगचं शिक्षण इंग्रजीमध्ये. यामुळे अनेक विद्यार्थांना ही डिग्री पूर्ण करणं काहीसं कठीण जातं. मात्र आता इंजिनीअरिंगच्या विद्यार्थांसाठी खुशखबर असून आता विद्यार्थी मराठीमध्ये शिक्षण घेऊ शकतात. तसेच यासाठी विद्यापीठाने देखील मान्यता दिली आहे.

पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने सीओईपीच्या तीन अभ्यासक्रमांना, पिंपरी चिंचवड ऑफ इंजिनीअरिंगच्या एका अभ्यासक्रमास मराठी माध्यमामध्ये सुरू करण्याची मान्यता दिली आहे. त्यासंबंधीचे परिपत्रक सोमवारी शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव एम. व्ही. रासवे यांनी काढले आहे.

एआयसीटीईने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देशभरातून 14 महाविद्यालयांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यात राज्यातून मराठी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी सीओईपी, पुणे आणि पिंपरीचिंचवड इंजिनीअरिंग कॉलेजांनी प्रस्ताव पाठविला होता. मराठीतून अभियांत्रिकीसाठी साहित्य निर्माण केले जाईल.

दरम्यान, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी इंग्रजीच्या भीतीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ‘एआयसीटीई’ने हा निर्णय घेतला आहे.

थोडक्यात बातम्या-

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलैचा दुसरा आठवडा महत्त्वाचा, शिक्षणमंत्र्यांनी सांगितली निकालाची तारीख!

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; करून दिली ‘ही’ आठवण

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ‘भारत बायोटेक’ला मोठा फटका; इतक्या कोटी डॉलर्सचा करार स्थगित

“शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही मानत असाल तर…”

तासाभरात होत्याचं नव्हतं झालं; रिमोटची बॅटरी गिळल्याने अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More