बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पबजी गेमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; PUBG Mobile India लवकरच भारतात लाँच होणार

मुंबई | भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तीन महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका दिला होता. केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अॅपसह 118 चिनी अॅप बॅन केले होते. त्यापूर्वी केंद्र सरकारने टिक टॉक, शेअरइट, हॅलो, यूसी ब्राऊझर यांसारखे एकूण 59 अॅप्लिकेशन बॅन केले होते. काही दिवसांपूर्वी PUBG Mobile गेम आता भारतात परतणार असल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हापासून हा गेम नेमका कधी लाँच होणार याची PUBG गेमच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

PUBG Mobile India हा गेम लवकरच भारतात लाँच होणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. भारतात PUBG Mobile लाँच होण्यासंबंधी अद्याप कोणतीही पक्की बातमी समोर आलेली नाही. भारतात या गेमसाठीचं अप्रूव्हल मिळवण्यात अनेक अडचणी समोर येत आहेत. दुसऱ्या बाजूला पबजीने भारतात एका कंपनीची स्थापना केली असून, तिथे लोकांना कामावर घेतलं जात आहे.

PUBG कॉर्पोरेशनने हायर करण्यासाठी लिंक्डइनवर जॉब व्हॅकेन्सी पोस्ट केली आहे. जॉब डिस्क्रिप्शन कंपनीने म्हटलं आहे की, उमेदवाराला भारत आणि MENA क्षेत्राशी संबंधित प्रक्रियेचे आणि जागतिक कराराच्या प्रवाहाचे मूल्यांकन करणे तसेच त्यांच्या ग्लोबल टीम्सना असिस्ट करणे यांसारखी कामं करावी लागतील.

दरम्यान, PUBG Corporation ने म्हटलं आहे की, आमचं नवं गेमिंग अॅप युजर्सना जास्तीत जास्त सुरक्षा आणि जबरदस्त गेम प्ले प्रदान करेल. भारतीय प्लेयर्सशी सहज कम्युनिकेशन व्हावे यासाठी कंपनी एक सबसिडरी तयार केली जाणार आहे. तसेच कंपनी भारतात 100 कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन ‘या’ केंद्रीय मंत्र्याची ठाकरे सरकारवर बोचरी टीका, म्हणाले…

…तर एवढ्या दिवस ते गप्प का बसले?- रूपाली चाकणकर

कोरोनाची भीती दाखवून सरकार दहशत माजवतंय- बंडातात्या कराडकर

“अनिल देशमुख यांच्याआधी उद्धव ठाकरेंचा राजीनामा घ्या, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही”

“महाराष्ट्रात गृहविभाग नेमकं कोण चालवतंय; अनिल परब की अनिल देशमुख?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More