PM Kisan 19th Installment | सध्या सर्वजण 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाची (Union Budget) आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांना (Farmers) या अर्थसंकल्पाकडून खूप आशा आहेत. विशेषत: प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये (PM Kisan Samman Nidhi) वाढ होण्याची चर्चा आहे. सध्या प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्याला (Marginal Farmer) वर्षाला 6 हजार रुपये थेट बँक खात्यात (Bank Account) दिले जातात. ही रक्कम वाढवून 12 हजार करण्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, त्याआधीच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी ही माहिती दिली आहे. (PM Kisan 19th Installment )
शेतकऱ्यांना लवकरच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM-KISAN Scheme) लाभ मिळणार आहे. या योजनेचा 19 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
19 व्या हप्त्याबाबत कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा!
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा 19 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. या योजनेचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधून (Bihar) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत, अशी माहिती कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा केले जातात. यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी 18 वा हप्ता वाशिम (Washim) येथून हस्तांतरीत करण्यास सुरुवात केली होती. देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 वा (PM Kisan 19th Installment ) हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा इतिहास
केंद्रातील मोदी सरकारने 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना सुरू केली. अल्पभूधारक शेतकऱ्यांना अर्थसाह्य (Financial Assistance) करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. वर्षात 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. आत्तापर्यंत PM किसानचे 18 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.
मोदी सरकारने 2019 मध्ये ही योजना सुरू केली होती. अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
Title: Good News for Farmers PM Kisan 19th Installment to be Credited Soon