PM Kisan Yojana l शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या २४ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते बिहारमध्ये (Bihar) एका विशेष कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-KISAN) हप्त्याचे वितरण होणार आहे. तसेच, नमो सन्मान निधी योजनेचा (Namo Sanman Nidhi Yojana) सहावा हप्ता १ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत :
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार (State Government) शेतकऱ्यांसाठीच्या आर्थिक मदत योजनांना गती देत आहेत. काही महिन्यांपूर्वी वाशिम (Washim) जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते PM-KISAN योजनेच्या १८ व्या हप्त्याचे आणि नमो सन्मान निधीच्या ५ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते. ९.४ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता, तर ९१ लाख शेतकऱ्यांना नमो योजनेचा लाभ मिळाला होता.
PM Kisan Yojana l नमो शेतकरी महासन्मान योजना :
केंद्र सरकारच्या धर्तीवर, महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) २०२३ मध्ये ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून सहावा हप्ता १ मार्चपर्यंत जमा होणार आहे.
पात्रता :
PM-KISAN योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना आपोआप नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळतो. सध्या राज्यातील ९१ लाख शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत आणि त्यांनाच नमो योजनेचा सहावा हप्ता मिळेल.
महिला लाभार्थ्यांसाठी बदल :
महिला शेतकऱ्यांना याआधी PM-KISAN आणि नमो योजनेतून दरवर्षी १२,००० रुपये मिळत होते. मात्र, राज्य सरकारच्या आर्थिक भारामुळे ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) मध्ये बदल करण्यात आला आहे. याआधी महिला लाभार्थ्यांना या योजनेतून महिना १,५०० रुपये मिळत होते, पण आता ५०० रुपये मिळतील. त्यामुळे अनेक महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
PM-KISAN योजनेसाठी ई-केवायसी आवश्यक!