बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर; आता मिळणार एवढ्या लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

मुंबई | नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अर्थमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंददायक घोषणा केली आहे.

राज्यात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचं तसेच काही प्रमाणात सवलत देण्याची घोषणा यापूर्वीच राज्य सरकारतर्फे करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने आज मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचं पिक कर्ज बिनव्याजी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी यामार्फत नक्कीच सोडवल्या जातील व प्रोत्साहनपर सरकारकडून मिळणाऱ्या सवलतीमुळे जे कर्जदार नियमित कर्जाची परतफेड करत नव्हते ते देखील आता नियमित कर्ज परतफेड करतील. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांना बिनव्याजी तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्णय झाला असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

यापूर्वी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येत होतं. परंतु, आता ही रक्कम वाढवून तीन लाखांपर्यंत करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारतर्फे घेण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

ग्रेट ग्रँड मस्तीमधील अभिनेत्रीने ट्रेनरचे घेतलेले पंचेस पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

“मुंबईत सगळं काही ब्रिटिशांनी केलं, मग शिवसेनेनं काय केलं?”

कोरोना लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर; तब्बल 50 लाखांहून अधिक लोकांनी घेतला लसीचा दुसरा डोस

कौतुकास्पद! ‘या’ अभिनेत्यानं दत्तक घेतलेल्या गावात राबवली लसीकरण मोहिम

“वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More