Top News तंत्रज्ञान

चारचाकी चालकांसाठी आनंदाची बातमी; सरकार लवकरच हा निर्णय लागू करणार!

मुंबई | चारचाकी वाहन चालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत सरकारकडून कारच्या पुढच्या सीटसाठी एअरबॅग अनिवार्य करण्याचा आदेश जारी केला जाऊ शकतो.

सरकारच्या या आदेशांमध्ये इकॉनॉमी मॉडेल्सच्या गाड्यांचा देखील समावेश होणार आहे. त्यामुळे आता कार बनवणाऱ्या सर्व कंपन्यांना पुढच्या सीटसाठी एअरबॅग अनिवार्य करण्यात येण्याची शक्यता आहे.

या प्रस्तावाला तांत्रिक समितीकडून मान्यता मिळालीये. यानंतर सरकारने यासंबंधीचा मसुदा अधिसूचना देखील जारी केलीये. ही अधिसूचना ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्डला पाठवण्यात आलीये.

सध्याच्या घडीला तरतुदींनुसार एकच एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. मात्र, इतकी सुरक्षा व्यवस्था पुरेशी नसल्याने मोटारकारच्या पुढील सीटसाठीही एअरबॅग अनिवार्य करण्याचा विचार सरकार करतंय.

थोडक्यात बातम्या-

अंबानींच्या ॲाफीसवर मोर्चा; बच्चू कडू, राजू शेट्टींसह ‘हे’ दिग्गज नेते होणार सहभागी

सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; ‘या’ मुद्द्यांकडे वेधलं लक्ष!

…तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते?- हसन मुश्रीफ

अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण; नाटकाचे प्रयोग केले रद्द

“करण जोहरच्या पार्टीची चौकशी फडणवीस सरकारच्या काळात का नाही केली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या