बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट

नवी दिल्ली | तुम्ही सरकारी कर्मचारी (Government employees) असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कर्मच्याऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ होणार आहे. इतकंच नव्हे तर  2023 साठी सरकार त्यांना सरप्राईज गिफ्टही देणार आहे.

जुलै 2022 पासून केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता वाढवला जाईल याच्या प्रतिक्षेत होते. श्रम मंत्रालयाने भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकाचे(AICPI) आकडे जाहीर केले होते. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्यात यासंबधी निर्णय होणार आहेेेेेे.

2022 AICPI निर्देकांनुसार जूनपेक्षा जुलैमध्ये 0.7 अंकाची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील वर्षातही महागाई भत्त्यात (DA) वाढ होणार आहे. ही वाढ कधी आणि कीती होणार याची प्रतिक्षा आता कर्मच्याऱ्यांना करावी लागणार आहे.

कमीतकमी चार टक्यांची वाढ भत्यात होणार आहे. सणासुदीच्या वेळात ही महत्वाची बातमी समोर आली आहे. नवरात्रीत याविषयीच निर्णय होऊ शकतो. 28 सप्टेंबरला यासंबधी बैठक होणार असून त्यात याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

थोडक्यात बातम्या 

महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी!

आदित्य ठाकरेंचं गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More