महागाईने त्रस्त नागरिकांसाठी आनंदाची बातमी; पेट्रोल डिझेलबाबत सरकारची मोठी घोषणा
नवी दिल्ली | केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली आहे.
आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सांगितलंय.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या घरगुती गॅस सिलेंडरला 200 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचं सीतारमण यांनी सांगितलं. योजनेच्या 9 कोटी लाभार्थ्यांना एकूण 12 सिलेंडरपर्यंत ही सबसिडी लागू असेल.
पेट्रोल-डिझेलवरच्या टॅक्समुळे राज्याच्या तिजोरीत भर पडत असली तरी त्यामुळे नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरचे टॅक्स कमी करावेत, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.
थोडक्यात बातम्या-
अफगाणिस्तानात महिलांचे हाल; तालिबान्यांनी सुनावलं नवं फर्मान
राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज
‘कान्स’मध्ये रेड कार्पेटवर अचानक टॉपलेस झाली महिला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
‘### दम असेल तर उचलून दाखवा अन् कारवाई करा’; प्रकाश आंबेडकर संतापले
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Comments are closed.