बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयफोन चाहत्यांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून करता येणार ‘आयफोन 13’ची बुकिंग

नवी दिल्ली | आयफोन हा जगप्रसिद्ध ब्रँड आहे. आपल्या वैशिष्ट्यपुर्ण बनावटीसाठी आयफोन हा ओळखला जातो. जगातील कोट्यावधी ग्राहक आयफोनच्या नव्या ब्रॅंडची वाट पहात असतात. या सर्व ग्राहकांच्या सेवेत आयफोन सिरीज मधील ‘आयफोन 13’ हा लवकरचं बाजारात उपलब्ध होणार आहे.

आयफोनने आपल्या आयफोन 13 ची लाॅंचिंग तारीख जाहीर केली आहे. 14 सप्टेंबर 2021 ला आयफोन 13 सिरीज लाॅंच केली जाणार आहे. या सिरीजमध्ये आयफोन 13, आयफोन 13 प्रो, आयफोन 13 प्रो मॅक्स, आयफोन 13 मिनी हे फोन असतील अशी माहिती मिळत आहे. आयफोनच्या चाहत्यांना या सर्व माॅडेल्सची प्री बुकिंग 17 सप्टेंबर पासून करता येणार आहे.

24 सप्टेंबरपासून आयफोन 13 ची प्रत्यक्ष विक्री सुरू होणार आहे. या फोनमध्ये भरपूर नवनविन फिचर्स असणार आहेत. यात नविन माॅडेल कॅमेरा देखील असेल. आयफोन 13 मध्ये जुन्या माॅडलच्या तुलनेत अधिक चांगली अल्ट्रा वाइड लेन्स असणार आहेत. यात लेंन्सला 5 एलिमेंटच्या ऐवजी 6 एलिमेंटने अपग्रेड केली जाईल.

आयफोनने या सिरीजमध्ये भरपूर बदल केला आहे. फेस आयडीमध्ये बदल करण्यात आले आहेत. मास्क किंवा चष्मा असूनही आता आयफोन 13 तुम्ही अनलाॅक करू शकता. या आयफोनच्या सिरीजमध्ये फ्रंट कॅमेऱ्यामध्ये पण काही बदल करण्यात येणार आहेत. आपल्या या सर्व वैशिष्ट्यांसाठी आयफोन प्रसिद्ध आहे.

थोडक्यात बातम्या 

ईडीच्या नोटीस नंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…; पाहा व्हि़डीओ

“बिरोबाच्या बनात येऊन खोट्या शपथा घेणाऱ्याचं पार वाटोळं होतं”

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा वाढ; वाचा आजची आकडेवारी

‘अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा’; काँग्रेसची मोठी मागणी

भारतीय खेळाडूंकडून लयलुट सुरूच; आणखी 3 पदकं भारताच्या खात्यात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More