बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

MPSC Exam: इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; राज्य सरकारमध्ये तब्बल ‘इतक्या’ पदांसाठी मेगाभरती सुरू

मुंबई | महाराष्ट्र लाकसेवा आयोगाने (MPSC) उमेदवारांना आनंदाची बातमी दिली आहे. एमपीएससीने उमेदवारांना खुशखबर देत ‘गट क’ सेवा संयुक्त पूर्व परिक्षा 2021 साठी 900 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

मराठी लिपिक-टंकलेखकसाठी 473 पदे, इंग्रजी लिपिक-टंकलेखकसाठी 79 पदे, कर सहाय्यक (गट क) साठी 117 पदे, तांत्रिक सहाय्यक (गट क) साठी 14 पदे, उद्योग निरिक्षक (गट क) साठी 103 पदे तर दुय्यम निरिक्षक (गट क) पदासाठी 114 जागांचा समावेश आहे. या पदांमध्ये वित्त विभग, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, गृह विभाग व सामान्य प्रशासन विभागातील जागांचा समावेश आहे.

नमूद करण्यात आलेल्या सर्व पदांसाठी आधी 100 गुणांची एका तासाची बहुपर्यायी पूर्व परिक्षा होणार आहे. पूर्व परिक्षेनंतरच मुख्य परिक्षेसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.

‘संयुक्त परिक्षा पूर्व परिक्षा गट क 2021’ ही परिक्षा 3 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. 22 डिसेंबर 2021 ते 11 जानेवारी 2022 पर्यंत या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. MPSCच्या https://mpsconline.gov.in/candidate या अधिकृत संकेतस्थावर अधिक माहिती उपलब्ध आहे.

थोडक्यात बातम्या-

Omicronचा वेग डेल्टाच्या तिप्पट; ‘या’ राज्यातील फैलावामुळे चिंता वाढली

चिंताजनक! Omicronच्या धास्तीनं अनेक राज्यांत ‘या’ गोष्टीवर घातली बंदी

काँग्रेस मंत्र्याचा मंत्रीमंडळातून पत्ता कट?, नाना पटोेले म्हणतात…

पुन्हा लाॅकडाऊन लागणार का?, केंद्र सरकारचं राज्यांना तातडीचं पत्र

“अडीचपट जास्त पैसे दिले, पण संज्या म्हणेल…”, निलेश राणेंची खोचक टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More