Top News

नवी मुंबईकरांसाठी महापालिकेडून मोठी खुशखबर

नवी मुंबई | मुंबईनंतर आता नवी मुंबईतही 500 चौरस फुटापर्यंत चटई क्षेत्र असलेल्या घरांना मालमत्ता कर संपूर्णपणे माफ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकांपूर्वी मुंबई पालिकेने 500 चौरस फुटापर्यंत घरांना मालमत्ता कर माफी दिली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतही हा नियम लागू करण्यात आला आहे.

शहरातील 500 चौरस फुटापर्यंतच्या निवासी घरांना मालमत्ता करमाफी  देण्यात येणार आहे. तर 501 ते 750 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात 60 टक्के सूट देण्यात येणार आहे.

दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय मंजूर करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुंबईतील सर्व जागा युतीच जिंकणार- देवेंद्र फडणवीस

-वडिलांचं छत्र हरपलेल्या शेतकरीकन्येचा शिक्षणखर्च रोहित पवारांनी उचलला

-पॉर्न बघत असाल तर सावधान; समोर आलीय अत्यंत धक्कादायक माहिती

-धक्कादायक!!! ‘बीव्हीजी’च्या हणमंतराव गायकवाडांना करोडोंचा गंडा

-मला क्रमांक 2 चा नेता म्हणू नका- गिरीश महाजन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या