बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारकडून ओबीसी विद्यार्थ्यांना दिवाळी गिफ्ट; शिष्यवृत्तीसाठी ‘इतके’ कोटी मंजूर

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात ओबीसी समाजाच्या अनेक मागण्यांवरून सरकार विरोधात आंदोलन राज्यात झाली आहेत. कोरोना महामारीनं सर्व क्षेत्राना फटका बसला होता. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर प्रलंबित होता. पण राज्य सरकारनं आज राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. याबाबतची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी 293 कोटी मंजूर करण्यात आले आहे. याचा थेट फायद राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे. ओबीसी, वीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील दहावी नंतर पुढील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी 292 कोटी 81लाख 85 हजार रुपये शासनाने मंजूर केलेले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ओबीसी संघटना आणि विद्यार्थी वर्गातून शिष्यवृत्तीसाठी सरकारवर दबाव वाढत होता. परिणामी सरकारनं ऐन दिवाळीच्या तोंडावर विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला आहे. शिष्यवृत्तीबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी मंजूर झालेली हि रक्कम महाडिबीटी प्रणालीद्वारे वितरित केली जाणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, यापूर्वी 436 कोटी रुपये रक्कम वितरित करण्यास सप्टेंबरमध्ये मान्यता दिली होती. ही रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर महाडीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात आली आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

“पाच वर्षात तुम्ही किती काळ परदेशात राहिलात याचा हिशोब द्या”

‘तो एक तेजस्वी तारा होता’; अभिनेता पुनीत राजकुमारच्या निधनानंतर सिनेसृष्टी हळहळली

“नवाब मलिक बोलतात ती वस्तुस्थिती असेल तर…”

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाचा अनिल देशमुखांना दणका

आर्यन खानची आज आर्थर रोड जेलमधून सुटका होणार का? वकिल मानेशिंदे म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More