बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी!

नवी दिल्ली | सणासुदीच्या तोडांवर आता एक खुशखबर समोर आली आहे. लवकरच घरगुती एलपीजी (LPG gas) गॅस सिलेंडरच्या किमतीत घट होणार आहे. यामुळे आता सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

मार्च 2022 पर्यंत गॅसच्या किमती जेमतेम होत्या. रशिया आणि युक्रेन (Ukrain) यांच्या युद्धानंतर तेल आणि गॅस वितरित कंपन्यांनी गॅसच्या किमती वाढवल्या होत्या. आता याबाबत विचार करण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे.

ओएनजीसी (ONGC) आणि रिलायन्ससारख्या (Like Reliance) प्रमुख तेल उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या गॅसच्या किंमती निश्चित करण्यात येणार आहेत. यासाठीचे आदेश पेट्रोलियम आणि वायू मंत्रालयाने जारी केला आहे. नियोजन आयोगाचे माजी सदस्य किरीट.एस. पारीख याच्यां नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

स्थापन करण्यात आलेली ही समिती गॅसच्या वाजवी किमती ठरवणार आहे. शहरातील गॅस वितरण आणि इतर गॅस आणि ऑइल कंपन्याचे प्रत्येकी एक प्रतिनिधी (Representative) या समितीमध्ये असणार आहेत.

सायरस मिस्त्रींच्या निधनानंतर नितीन गडकरींचा मोठा निर्णय!

ठाकरेंना घेरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा प्लॅन, ठाकरेंची अडचण वाढणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More