नवी दिल्ली | अनेकजण सरकारी नोकरीमध्ये (Govt job) मिळणाऱ्या फायद्यांमुळे सरकारी नोकरीच्या शोधात असतात. आता मात्र खासगी नोकरी करणाऱ्यांनादेखील फायदे मिळणार आहेत. नुकताच 2023-24 चे अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी खासगी नोकरदारांचा देखील विचार केला आहे. यावेळी त्यांनी खासगी नोकरदारांसाठी एक फायद्याची घोषणा केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे की, गैर-सरकारी पगारदार कर्मचाऱ्यांना रजा रोखीव कर सवलतीचा लाभ 3 लाख रुपयांवरुन 25 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. खासगी नोकऱ्या (Private jobs) करणाऱ्यांना रजा नगदीकरणात दिलासा देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात केला आहे.
लीव्ह एनकॅशमेंटमधील (Leave encashment) कर सूट मर्यादा 3 लाखांवरुन 25 लाख रुपये करण्यात आली आहे. खासगी नोकऱ्यांमध्ये असलेल्यांना 25 लाख रुपयांपर्यंतच्या रजेच्या रोखीवर कोणताही कर भरावा लागणार नाही,असंदेखील त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. लीव्ह एनकॅशमेंटमधून मिळणारी रक्कम पगाराचा भाग मानली जाते.
नोकरीदरम्यान, कॅज्युअल लीव्ह (Casual Leave), सिक लीव्ह (Sick leave)अशाप्रकारच्या रजा मिळतात. निर्धारित ज्या सुट्या आहेत त्या योग्यवेळेत घेतल्या नाहीत तर त्या संपतात. त्या सुट्ट्या तशाच राहतात. एखादी व्यक्ती नोकरी सोडते किंवा निवृत्त होते, तेव्हा त्या उरलेल्या सुट्ट्या कंपनीकडून कॅश करुन घेऊ शकता. या सुट्यांसाठीही तुम्ही पैसे घेऊ शकता. यालाच लीव्ह एनकॅशमेंट म्हणतात.
महत्त्वाच्या बातम्या