बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांसाठी खूशखबर! अखेर ‘या’ मार्गे पुण्यात झालं मान्सूनचं आगमन

पुणे | पुण्यामध्ये मान्सूनचं आगमन झालं आहे. मान्सूनची आता महाराष्ट्रात वेगाने आगेकूच होत असताना दिसून येत आहे. सध्या आलिबाग मार्गे पुण्यात मान्सून पोहोचला आहे. अलिबागकडून पुण्यापर्यंत मान्सूनचं आगमन झालं आहे. त्यानंतर सोलापूर, लातूर जिल्ह्यातून तेलंगणा व आंध्रप्रदेशमध्ये मान्सून दाखल होईल.

दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे. रत्नागिरीच्या बंदरावरून महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून येणाऱ्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्राला मान्सून व्यापून टाकेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच दरवर्षीपेक्षा मान्सून पुण्यामध्ये चार दिवस आधीच दाखल झाल्याने समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

येणाऱ्या 24 तासात महाराष्ट्रात मान्सुन सक्रीय होणार आहे. तसेच पुण्यात मान्सुनचं आगमन लवकर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. रत्नागिरीच्या हरणाई बंदरावरुन महाराष्ट्रात मान्सुनने आगमन केलं आहे. 4 जूनला कर्नाटकच्या किनारपट्टीवर मान्सुन धडकला.

यंदा सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडुन वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याने फायदा होणार असल्याचं दिसुन येत आहे.

थोडक्यात बातम्या

टीम इंडीयाच्या ‘या’ अनुभवी खेळाडूनं किचनमध्ये दाखवली आपल्या हाताची जादू; पाहा व्हिडीओ

WTC च्या फाईनलची तयारी करणाऱ्या विराटबद्दल अनुष्कानं भन्नाट कॅप्शन देत पोस्ट केला ‘हा’ फोटो

‘या’ जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रूग्णांना आवश्यक असलेल्या इंजेक्शनसाठी रुग्णालयाला द्यावं लागणार हमीपत्र

खुर्ची हे माझं स्वप्न नव्हतं, पण पुत्रकर्तव्य म्हणून मी खुर्चीवर आहे- उद्धव ठाकरे

डान्स इंडिया डान्स फेम ‘या’ कलाकाराचा गंभीर अपघात; देतोय मृत्यूशी झुंज

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More