बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांसाठी खुशखबर! बहुप्रतिक्षीत ‘स्पुटनिक वी’ लस ‘या’ तारखेपासून मिळणार

पुणे | मे महिन्याच्या मध्यात रशियाने विकसित केलेली स्पुटनिक ही लस भारतात आली होती. त्याआधी भारतात फक्त कोवाॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोनच लसीच्या वितरणाला परवानगी देण्यात आली होती. पण आता रशियाच्या स्पुटनिक वी या लसीच्या वितरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता ही लस पुण्यात देखील मिळणार आहे. स्पुटनिक लस आता पुण्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध झाली आहे.

देशात स्पुटनिक वी लसीचे भारतातील वितरण हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी यांच्याकडून करण्यात येत आहे. या लसीचा एक डोस 1142 रुपयांना खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. पहिल्या टप्प्यात पुण्यात याचे 600 डोस उपलब्ध झाली आहे. सध्या महाराष्ट्रातील फक्त पुण्यात ही लस उपलब्ध आहे. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात एका 36 वर्षीय व्यक्तीला स्पुतनिकची लस दिली गेली. पुण्यात 28 जूनपासून ही लस सर्वत्र उपलब्ध होईल.

रशियानं तयार केलेल्या स्पुटनिक लसीचे दोन डोस घेण्यामधील अंतर हे 21 दिवसांचं निश्चित करण्यात आलं आहे. पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना लसीचा दुसरा डोस 21 दिवसानंतर घ्यावा लागतो. स्पुटनिक वी लसीच्या एका डोसची किंमत 1142 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. स्पुटनिक वी लस कोरोनाविरुद्ध तब्बल 92 टक्के प्रभावी आहे.

दरम्यान, लस अत्यंत प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. ही लस विकसित करण्यासाठी सर्दीच्या विषाणूचा वापर करण्यात आला आहे. स्पुटनिक वी लसीला एकूण 55 देशांमध्ये मान्यता देण्यात आली आहे. 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानातही साठवता येते. त्यामुळं भारतासारख्या उष्ण तापमानाच्या देशात ही यशस्वी ठरु शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

थोडक्यात बातम्या-

सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ती आहे का?- संजय राऊत

“माझ्याशिवाय आणीबाणी कोणालाच कळणार नाही”

शाळा सुरू करण्याचं धाडस करताना विचार करावा लागेल- बच्चू कडू

“डेल्टा प्लसमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता नाही; महाराष्ट्राने कोरोनाची स्थिती उत्तम हाताळली”

“अनिल देशमुखांची काही दिवसांनी तुरूंगात रवानगी होणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More