रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; ‘या’ दोन मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू होणार!

Vande Bharat Express

Vande Bharat Train l राजस्थान आणि गुजरातला जोडणारी, प्रवाशांसाठी रेल्वेची एक मोठी भेट असणारी उदयपूर ते अहमदाबाद वंदे भारत ट्रेन लवकरच रुळावर धावणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रक रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. २६ जानेवारी नंतर ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत रुजू होण्याची शक्यता आहे. ही ट्रेन मंगळवार सोडून इतर सर्व दिवशी, आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.

रेल्वेच्या या नवीन उपक्रमामुळे, प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे. उदयपूरहून सकाळी ६:१० वाजता सुटणारी ही ट्रेन, अवघ्या साडेचार तासांत, म्हणजेच सकाळी १०:२५ वाजता अहमदाबाद (असारवा) येथे प्रवाशांना पोहोचवेल.

परतीच्या प्रवासासाठी, ही ट्रेन अहमदाबादहून (असारवा) सायंकाळी ५:४५ वाजता सुटेल आणि रात्री १० वाजता प्रवाशांना उदयपूरला पोहोचवेल. या ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ साडेपाच तासांवरून थेट साडेचार तासांवर येणार आहे.

Vande Bharat Train l प्रवासाचा वेळ वाचणार, सुविधाही उत्तम

उदयपूर ते अहमदाबाद हे अंतर जवळपास २९६ किलोमीटर इतके आहे. वंदे भारत ट्रेन सुरू झाल्याने प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे, तसेच त्यांना आरामदायी प्रवासाचा आनंदही घेता येणार आहे. या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पश्चिम रेल्वेने आधीच पूर्ण केले असल्याने, आता या मार्गावर विजेवर चालणाऱ्या गाड्या धावत आहेत.

तिकीट दराबाबत माहिती :

वंदे भारत ट्रेनच्या चेअर कारचे भाडे साधारणपणे १०६५ रुपये तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे जवळपास १८९० रुपये असण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेकडून या गाडीच्या थांब्यांचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. या वेळापत्रकात गाडी कोणत्या स्थानकावर किती वेळ थांबेल, याचा तपशील असेल. या ट्रेनच्या संचालनाबाबतची सर्व तयारी पूर्ण झाली असून, लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

पर्यटन आणि व्यापार वाढीस चालना :

उदयपूर आणि अहमदाबाद दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू झाल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. शिवाय, या जलद रेल्वे सेवेचा लाभ घेत, दोन्ही राज्यांमधील पर्यटनाला आणि व्यापाराला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

News Title : Good News for Rajasthan and Gujarat Passengers! Udaipur-Ahmedabad Vande Bharat Train to Start Soon

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .