बाईक प्रेमींचं पहिलं क्रश असलेल्या Royal Enfield च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!
मुंबई | रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) बाईकला आपल्याकडे खूप मागणी आहे. लहान मुलं ते मोठी माणसं सर्वच वयोगटातील व्यक्तिंना रॉयल एनफिल्ड कंपनीच्या बाईकचं वेगळंच क्रेझ आहे. Royal Enfield च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलीये. कंपनी लवकरच नवी बाईक लाँच करणार असल्याचं कळतंय.
हंटर 350 लवकरच लॉन्च होणार आहे आणि आता या बाईकचे फिचर्स लीक झाले आहेत. कंपनी पुढील वर्षाच्या सुरुवातीस भारतात नवीन बुलेट लाँच करू शकते.
ही बाईक नुकतीच टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे. स्पॉटेड मॉडेल सूचित करतं की ही बाईक अनेक ग्राफिकल अपडेट्स आणि नवीन रंगांसह बाजारात येईल. या बाइकमध्ये पारंपारिक किक स्टार्ट मिळणार नाही. याशिवाय इतरही अनेक बदल या बाइकमध्ये पाहायला मिळतील.
यापूर्वी रॉयल एनफील्ड हंटर 350 बद्दल बरीच माहिती समोर आली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या बाईकमध्ये 349cc इंजिन वापरले जाऊ शकते. बाईकचे सिंगल सिलिंडर इंजिन 20bhp पर्यंत पॉवर जनरेट करू शकते.
थोडक्यात बातम्या-
आर. माधवनच्या लेकाचा देशाला अभिमान; केली ‘ही’ कामगिरी
‘हा कॉमेडी एक्सप्रेस सिजन 2 आहे’; राऊतांनी शिंदे गटाची उडवली खिल्ली
उद्धव ठाकरेंकडून कारवाईचा सपाटा सुरूच, आणखी एका नेत्याची केली पक्षातून हकालपट्टी
आमदारांनंतर आता शिवसेनेच्या खासदारांनीही उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढवलं; महत्त्वाची माहिती समोर
SBI च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; बँकेने घेतला महत्त्वाचा निर्णय
Comments are closed.