बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; अशोक चव्हाणांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाजात मोठा असंतोष पसरला होता. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मुक आंदोलन देखील करण्यात आलं होतं. त्यानंतर सरकारने मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या पारड्यात टाकला. मराठा समाजाचा असंतोष पाहता आता मराठा विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारने खुशखबर दिली आहे.

राज्यातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने 23 वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील 14 वसतिगृह तयार झाली असून लवकरच ही वसतिगृह सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते या इमारतींचं उद्धाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच सारथीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं देखील अशोक चव्हाणांनी सांगितलं आहे. संस्थेसाठी 150 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याचं चव्हाणांनी सांगितलं. तर मराठा आंदोलकांवर दाखल केलेल्या खटल्यांपैकी 199 खटले मागे घेण्यात आले आहेत. तर, 109 खटले मागे घेण्यासाठी न्यायालयाला विनंती देखील करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबई व मुंबई उपनगर, पुणे, सातारा, मिरज, कोल्हापूर, बीड, लातूर, अमरावती, नागपूर येथे प्रत्येकी एक आणि नाशिक व औरंगाबाद येथे प्रत्येकी दोन वसतिगृहांचा समावेश आहे. अशी एकूण 14 वसतिगृह सध्या पुर्ण झाली आहेत. त्यामुळे लवकरच येत्या काळात मराठा विद्यार्थ्यांसाठी ही वसतिगृह वापरता येणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

“मंदिरं उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो”

खेळत-खेळत चिमुकला आला रस्त्यावर, भरधाव वेगात मागून गाडी आली अन्…, पाहा व्हिडीओ

पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर; वाचा आजचे ताजे दर

“सर्वांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावून द्या, आमचा सीएम जगात भारी”

भारतीय पुरूष हाॅकी संघाचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये बेल्जियमकडून भारताचा पराभव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More