बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोविशिल्ड लस घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी; सशस्त्र सेना दलाच्या अभ्यासात ‘ही’ माहिती आली समोर

नवी दिल्ली | गेल्या दी़ड वर्षांपासुन भारतासह संपुर्ण जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच कोरोना लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. आता भारतात प्रामुख्याने देण्यात येणाऱ्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींपैकी कोविशिल्डबद्दल केलेल्या अभ्यासातुन महत्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे.

कोविशिल्ड लसीच्या बाबतीत सशस्त्र सेना दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयातुन एक अभ्यास समोर आला आहे. त्यानुसारच कोविशिल्ड लस कोरोनावर 93 टक्के प्रभावी असल्याचं स्पष्ट झालं आहे. केंद्र सरकारने लसीच्या परिणामतेवर सशस्त्र दलाच्या अभ्यासाचा संदर्भ देत कोविशिल्ड लस 93 टक्के प्रभावशाली असुन या लसीचा डोस घेतलेल्यांचा मृत्युदर हा 98 टक्क्यांपर्यंत कमी असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान, लस किती प्रभावी आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना आता नवी माहिती समोर आल्याने कोविशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांना दिलासा मिळत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. भारतामध्ये आतापर्यंत 45 कोटींहुन अधिक नागरिकांचं लसीकरण पुर्ण झालं आहे.

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोका असताना आता कोविशिल्ड लसीबाबत केंद्र सरकारने दिलेल्या दिलासादायक माहितीमुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आता कोरोना आटोक्यात आला असला तरी लवकरात लवकर नागरिकांनी कोरोना लसीकरण करून घेणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या –

‘या’ महिन्यापासून लहान मुलांना मिळणार कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना तातडीचं पत्र; केलं ‘ही’ मोठी मागणी

राज्य सरकारचा पूरग्रस्तांना दिलासा; करणार इतक्या हजार कोटींची मदत

‘या’ लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही…; अभ्यासातून चिंताजनक माहिती समोर

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More