बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर, प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

मुंबई | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल (Mumbai Local) सेवा सर्वसामान्यांसाठी पुर्णत: बंद करण्यात आली होती. तसेच आता कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असताना पुन्हा एकदा लोकल सेवा सुरू करण्यासंदर्भात निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला होता. त्यातच आता तिकीट घेण्यासाठी गर्दी होत असल्याने प्रशासनाने त्यादृष्टीने पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.

मुंबई लोकल (Mumbai Local) सुरू केल्यानंतर आता लोकल स्थानकावर मोठ्या प्रमाणात तिकीट काढण्यासाठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

युनिव्हर्सल तिकीटींग सिस्टीम म्हणजेच UTS ॲपला आता राज्य सरकारच्या प्रणालिशी जोडण्यात आले असून तिकिटासाठी होत असलेली गर्दी आणि तिकीट खिडकीत होणारा गोंधळ यातून मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच नागरिकांना आता ऑनलाईन (Online App) स्वरूपात ॲपचा वापर करून तिकीट काढता येणार आहे.

राज्य सरकारच्या ॲपशी (UTS APP) ॲप लिंक करण्यात आले असून त्यामुळे आता नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाचणार आहे. तसेच ते तिकीट व पास मिळवण्यासाठी सोयीचं होणार आहे. मुंबईतील चाकरमान्यांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे. तसेच आज मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या

इंधन दर स्वस्त करण्यासाठी ‘हा’ आहे मोदी सरकारचा ‘मास्टर प्लान’

राज्य सरकारने दिलेली ‘ही’ ऑफर एसटी कर्मचारी मान्य करणार का?

…म्हणून ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमनं मागितली नारायण राणेंची माफी

तळीरामांची चिंता वाढली, दारू विकत घ्यायची असल्यास आता…

महाविकास आघाडीत नाराजीचा सुर; शिवसेना मंत्र्याचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More