Top News देश

टिकटाॅक युजर्ससाठी खूशखबर, भारतात टिकटाॅक पुन्हा होणार सुरू??

दिल्ली | भारतभर प्रसिद्ध असलेलं टिकटाॅक अॅप बॅन झाल्यानंतर बऱ्याच टिक टाॅक युजर्सनी निराशा व्यक्त केली होती. टिक-टाॅक बॅन झाल्यानंतर सगळे इन्स्टाग्रामच्या रिल्सचा वापर करत आहेत मात्र लोकांना ते फिचर काही जास्त आवडलेलं दिसत नाही. अशातच जे टिक-टॉक युजरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे.

टिकटाॅकला भारतात पुन्हा चालू करण्यासाठी बाईटडान्स ही कंपनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. लोकप्रिय टिकटाॅक अ‌‌ॅपवरचा बॅन हटला नाही तर बाईटडान्स त्याचा भारतीय टिकटाॅकचा बिझनेस देशी कंपनी ग्लांसला विकू शकतो. रोपोसो हे त्या कंपनीचे लोकप्रिय अॅप आहे.

जुलै 2020 मध्ये टिकटाॅकसह 59 अॅपवर बंदी घालण्यात आली होती तेव्हा भारतात बाईटडान्स कंपनीचे 7 ऑफिस होते. मात्र भारतात टिकटाॅक बॅन झाल्यानंतर या कंपनीला एका दिवसात 1 कोटी 64 लाखाचा झटका बसला होता.

दरम्यान, बाईटडान्स ही कंपनी भारत सरकारसोबत बोलून या अॅपवरचा बॅन काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे टिकटाॅक यूझर्सना पुन्हा या अॅपचा वापर करता येईल अशी शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला, म्हणाले…

मोदींच्या कुटुंबातील व्यक्तीनं केलेल्या आरोपानं खळबळ

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ‘तो’ मुलगा गायब!

पुण्यातील ‘या’ रस्त्यावर 7 किलोमीटर लांबीचा दुमजली उड्डाणपूल होणार!

अशी ही बनवाबनवी!!! ‘एक्स’ची अंगठी चोरुन केलं ‘नेक्स्ट’ला प्रपोज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या