‘बुकिंग रद्द करू नका’, जम्मू-काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांसाठी दिलासादायक बातमी समोर!

jammu kashmir

Jammu-Kashmir | 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या घटनेनंतर आठवडाभर वातावरणात भीतीचं सावट होतं. बाजारपेठा बंद होत्या आणि पर्यटकांचा ओघही थांबला होता. मात्र आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. स्थानिक आणि सुरक्षायंत्रणांच्या प्रयत्नांमुळे पुन्हा एकदा पहलगाममध्ये नवजीवन दिसू लागले आहे.

पर्यटकांचा आत्मविश्वास आणि अनुभव-

पहलगामच्या (Jammu-Kashmir) अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेल्या पर्यटनावर या हल्ल्याचा मोठा परिणाम झाला होता. तरीही काही पर्यटकांनी परिस्थितीचा सामना करत काश्मीरला भेट दिली आहे. मुंबईचे अक्षय सोळंकी म्हणाले की, “हल्ल्याच्या दिवशी आम्ही गुलमर्गमध्ये होतो. गटात थोडी भीती होती, पण फ्लाइटचे दर वाढल्यामुळे थांबलो. हॉटेलवाल्यांचा आधार मिळाला, त्यामुळे घाबरलो नाही.” हैदराबादचे संतोष कुमार यांनी सांगितले, “वातावरण चांगले आहे, थोडी भीती आहे, पण काही त्रास नाही.” आणखी एका पर्यटकाने म्हटलं, “हल्ल्याचा विचार नक्कीच होतो, पण स्थानिकांचा माणूसकीचा भाव पाहून भीती दूर झाली.”

स्थानिकांचा आवाज आणि रोजगाराची चिंता-

हल्ल्यानंतरचा थांबलेला (Jammu-Kashmir) पर्यटकांचा ओघ आता हळूहळू वाढू लागला आहे. शॉल विक्रेते रफी अहमद यांनी सांगितले, “पर्यटकच आमचा व्यवसाय चालवतात. हल्ल्यामुळे झटका बसला, पण आता थोडा आशा निर्माण झाली आहे.” ड्रायव्हर मोहम्मद इस्माइल यांनी भावनिक आवाहन केलं, “कृपया आम्हाला वेगळं ठरवू नका. आम्हीही भारतीय आहोत. आमच्या उदरनिर्वाहासाठी काश्मीरला नक्की या.”

काश्मीरची ओळख जपण्याचा निर्धार-

पहलगामचे माजी आमदार रफी अहम मीर यांनी सांगितलं की, “हल्ल्यामुळे आमचं नाव बदनाम झालं, पण आम्हीही जखमींना मदत केली आहे. आदिलसारखे काहीच लोक असे असतात, पण सगळे तसे नाहीत. एकजुटीने हा डाग पुसावा लागेल.” अभिनेता अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांनी देखील पहलगामला भेट दिली आणि हल्ल्याच्या विरोधात ठाम उभं राहत म्हटलं, “दहशतवाद्यांनी येऊ नका असं सांगितलं, पण आम्ही नक्की येणार. काश्मीर आमचं आहे. बुकिंग रद्द करू नका, कश्मीरियत जपा.”

पर्यटकांचा हळूहळू वाढणारा आत्मविश्वास आणि स्थानिकांचा भरवसा यामुळे पहलगाम पुन्हा जागं होत आहे. काश्मीरची ओळख, कश्मीरियत, आणि येथील अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी पर्यटकांनी यायचं थांबवू नये, असा सूर सर्वत्र उमटतो आहे.

News Title – good news for tourits going to jammu kashmir

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .