बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून गुडन्यूज, इतके पैसे होणार खात्यात जमा

मुंबई | श्रावण महिन्यातील सणवार सुरूच आहेत. त्यातच आता गणपती आगमनाचा मुहूर्त जवळ आला असता, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी(Goverment Employee) एक खुशखबर आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीए अरियरचे(DA Arrears) पैसे जमा झालेले आहेत. ही आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारने दिली आहे.

केंद्र सरकारने(Central Goverment) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात(Dearness Allowance) चार टक्के वाढ केली आहे. तसेच देशातील अनेक राज्यांनी देखील महागाई भत्ता वाढवला आहे. काही राज्यात महागाई भत्ता 34 टक्के आहे. त्यातच महाराष्ट्र सरकारने मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना 31 टक्क्यांचा डीएचा लाभ मिळत आहे. यापूर्वी दोन हप्ते जमा झालेल आहेत, आता तिसरा हप्ता सरकार खात्यावर पाठवत आहे.

महाराष्ट्र सरकारने सातवा वेतन आयोगाअंतर्गत थकबाकीचा तिसरा हफ्ता देण्याची घोषणा आधीच केली होती. महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू होण्यापूर्वी त्याची कागदपत्रे पूर्ण झाली होती. त्यामुळे जुलै ते ऑगस्ट महिन्यात थकबाकीचा तिसरा हफ्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे.

दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांमधील अ गटाला 30 ते 40 हजार रूपायांचा लाभ मिळणार आहे, ब गटातील कर्मचाऱ्यांना 20 ते 40 हजार रुपयांचा तर क गटमधील अधिकाऱ्यांना 10 ते 15 हजार रूपायांचा लाभ मिळणार आहे. तसेेच चौथ्या श्रेणीतील लोकांना 8 ते 10 हजार रूपये लाभ मिळणार आहे. शासनाचा हा  निर्णय सणाच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा ठरत आहे. त्यामुळे जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल तर तुमचे खाते तपासा.

थोडक्यात बातम्या-

ईडीच्या रडारवर असलेल्या भानवा गवळींनी बांधली मोदींना राखी

आरोप करणाऱ्यांना संजय राठोडांचा गंभीर इशारा, म्हणाले…

वरूण गांधीचा पंतप्रधान मोदींना घरचा आहेर, ‘या’ मुद्द्यावरून घेतला खरपूस समाचार

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल महत्वाची माहिती समोर

“शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळेबाज, खंडणीखोरांची मांदियाळी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More