बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान खात्याकडून ‘ही’ खुशखबर

नवी दिल्ली | देशभरात सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता हवामान खात्याकडून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भू-विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी मान्सूनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार देशात मान्सूनचे आगमन 1 जूनला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांना या वर्षी लवकर उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. देशभरात सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून वर्तवलेला अंदाज हा काही प्रमाणात दिलासादायक असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून या अंदाजानुसार, केरळमध्ये मात्र मान्सून 1 जूनला धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान 15 मे रोजी अधिकृत अंदाज जाहीर केला जाणार असून 31 मे रोजी पर्जन्यमानाचा अंदाज जाहीर होईल, असं भू-विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी बोलून दाखवलं आहे.

मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्याबरोबरच शेतीच्या कामांना यामुळे वेग येणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण होईल.

थोडक्यात बातम्या

मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिलासादायक; बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

कोरोना रोखण्यासाठी आता एकमेव पर्याय; राहुल गांधींच्या ‘या’ मागणीने धरला जोर

मुंबई विमानतळावर एअर अॅम्ब्युलन्सची इमर्जन्सी लँडिंग; पाहा व्हिडीओ

…अन् लातुरात चक्क मृतदेहांची अदलाबदल; एकाच मृतदेहावर दोन वेळा अंत्यसंस्कार!

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची गोंदियात बदली!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More