बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त झालं सोनं; वाचा तुमच्या शहरातील सोन्याचा भाव

नवी दिल्ली | यंदा स्वस्त दरात सोनं, चांदी खरेदी करण्याची संधी आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर कमी होत आहेत. मंगळवारी एमसीएक्सवर सोन्याचे भाव उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्यानं सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. मंगळवारी एक्सचेंज उघडल्यानंतर ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत 43 रुपयांनी कमी होत 49,100 रुपये प्रति तोळा झाली आहे. तर ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचे दर देखील 49,403 रुपयांवर आहेत. चांदीचा भावही कमी झाला आहे.

भारतात सोन्याचांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आधीच्या सत्रात एमसीएक्स वर सोन्याचे दर घसरल्यानंतर 49,131 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे 0.3 टक्क्यांनी कमी होत 71,619 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. तज्ज्ञांच्या मते देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर सध्या 49,550 ते 49,750 या स्तरावर राहतील. गेल्या आठवड्यात महागाईच्या अंदाजामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर 5 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. यावेळी दर साधारण 49,700 रुपये प्रति तोळाच्या आसपास होते. असं असलं तरीही हा भाव गेल्यावर्षीच्या सर्वोच्च स्तरापेक्षा जवळपास 7000 रुपयांनी कमी आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते.

एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात घसरणीमुळे सोमवारी दिल्लीमध्ये सोन्यामध्ये घसरण पाहायला मिळाली. 152 रुपयांच्या घसरणीनंतर याठिकाणी सोन्याचे दर प्रति तोळा 48,107 रुपयांवर पोहोचले होते. चांदीचे दर 540 रुपयांनी कमी होऊन 69,925 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,883 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव 27.55 डॉलर प्रति औंस होता.

दरम्यान, 24 कॅरेट सोन्याचा दर 4,851 प्रति ग्रॅम, 38,808 रुपये प्रति 8 ग्रॅम, 48,510 रुपये प्रति तोळा आणि 4,85,100 रुपये प्रति 100 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 47,510 आहे. तर आजचा चांदीचा भाव प्रति किलो 71,000 रुपये आहे. तर, दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,950 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 52,300 रुपये प्रति तोळा आहे. मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,510 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 48,510 रुपये प्रति तोळा आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 48,030 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 50,730 रुपये प्रति तोळा आहे. तसेच चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,050 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 50,240 रुपये प्रति तोळा आहे.

थोडक्यात बातम्या –

आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथील करावी; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

20 फुटाच्या चेंबरमध्ये पडल्यानंतर तरुण 25 सेकंदात दुसऱ्या चेंबरमधून बाहेर, पाहा व्हिडीओ

मोदी-ठाकरे भेट! पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत ‘या’ 12 मुद्यांवर चर्चा

मुंबईसह राज्यात ‘या’ दिवशी अतिवृष्टीचा इशारा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला ‘हे’ आदेश

महात्मा गांधींच्या पणतीला न्यायालयानं ‘या’ गुन्ह्यांतर्गत सुनावली 7 वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More