सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर, आजही दरात घसरण
नवी दिल्ली | भारतामध्ये सोन्याला प्रचंड मागणी आहे. यामुळे देशांतर्गत सोन्याचा भाव नेेहमीच गरम असतो. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. अशातच आता चीनच्या आर्थिक पेचप्रसंगाच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वधारले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम भारताही दिसून येत आहे.
भारतीय सराफ बाजारात सोन्याचा दर बुधवारी 196 रूपयांनी वाढून 45,746 रूपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा दर 59, 608 रूपये प्रति किलो झाला आहे. यामध्ये चांदीचा दर 319 रूपयांनी वाढलेला दिसून येत आहे.सकाळच्या सत्रात रूपयाचा भाव 26 पैशांनी कमी झाला होता.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1776 डॉलर आणि चांदीचा दर 22.72 डॉलर प्रति औंस या पातळीवर राहिला आहे. आगामी काळात भारतात अनेक सण येत आहेत . त्यामुळे सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
थोडक्यात बातम्या-
‘तुम्ही माझ्या पाया नका पडू, मीच तुमच्या पडतो’; ‘या’ मराठमोळ्या कलाकारासमोर झुकले महानायक!
महिला सुरक्षेबाबत नाना पटोलेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी
“प्रभू श्रीराम एक महापुरूष होते हे मी मानत नाही”; माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य!
भारताच्या इशाऱ्यानंतर ब्रिटनचा यु-टर्न; भारतीय नागरिकांना मोठा दिलासा
”आपलं कातडीबचाऊ समर्थन शिवरायांच्या महाराष्ट्रास साजेसं नाही”
Comments are closed.