बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खुशखबर! सोनं दोन हजारांनी तर चांदी चार हजारांनी घसरली; वाचा ताजे दर

नवी दिल्ली |  भारतामध्ये सोन्याला प्रचंड मागणी आहे. यामुळे देशांतर्गत सोन्याचा भाव नेेहमीच गरम असतो. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव 49 हजार रुपये प्रती तोळ्यावर पोहोचले होते. मात्र, आता सोन्याचे दर तब्बल 2 हजार रुपयांनी घसरले आहेत.

एमसीएक्सवर आज सोन्याचा दर 47 हजार 8 रुपये प्रती तोळा आहे. काल हाच दर 47 हजार 128 रुपये प्रती तोळा होता. म्हणजेच आज सोन्याच्या दरात कालच्या दरापेक्षा 120 रुपयांची घट झाली आहे. सोन्याप्रमाणेच या महिन्यात चांदीच्या दरात देखील मोठी घट झाली आहे.

दोन आठवड्यापुर्वी एमसीएक्सवर चांदीचा दर 72 हजार रुपये प्रती किलो होता. चांदीचा हाच दर आता तब्बल 4 हजार रुपयांनी घसरला आहे. आज एमसीएक्सवर चांदीचा दर 68 हजार रुपये प्रती किलो आहे. अवघ्या दोन आठवड्यात चांदीचे दर 4 हजार रुपयांनी खाली आले आहेत.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या – 

राज्य सरकारने केली यंदाच्या गणेशोत्सवासाठीची नियमावली जाहीर, वाचा सविस्तर!

“पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 मध्ये क्लीन बोल्ड होणार”

‘कोविशिल्ड’ लस घेतलेल्या भारतीयांना ‘या’ देशात जाण्यास अडचणी, पुनावाला म्हणाले….

गरोदरपणातील कपड्यांची अनुष्का शर्मा करणार विक्री

एकेकाळी सर्वाधिक कोरोना मृत्युदर असणारा ‘हा’ देश बनला युरोपातला पहिला मास्क फ्री देश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More