मुंबई | भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई उद्यानातील पेंग्विन कुटुंबात नव्या सदस्याची चाहूल लागली आहे. या उद्यानातील मादी पेंग्विनने अंडं दिलं आहे.
राणीच्या बागेतील पेंग्विनच्या 6 जोड्यांपैकी पेंग्विन मिस्टर मॉल्ट आणि त्याची मादी फ्लिपर या जोडीने ही गोड बातमी दिली आहे. या अंड्यातून 40 दिवसांनी पेंग्वीनचा जन्म होणार आहे.
दरम्यान, भारतात प्रथमच पेंग्विनचा जन्म होणार आहे. त्याच्या जन्माला अजून सव्वा महिना असला तरी आतापासूनच राणीच्या बागेत त्याच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-वेळ आली तर गनिमी काव्याने आंदोलन करु- राजू शेट्टी
-बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे कुठे गेले?; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
-भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना शरम वाटली पाहिजे- शरद पवार
-शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात इंग्लंडचा विजय
-संभाजी भिडेंनी आम्हाला शब्द दिलाय; शिवसेनेचा दावा