नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. विदर्भ आणि मराठवाडा उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाला आहे. त्यातच आता दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. रविवारी केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. तसेच राज्यात पुढील तीन ते चार दिवसांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उद्यापासून दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लगतच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवारी सकाळी केरळमध्ये काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.
30 मे पासून पुढील चार दिवस राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणातील काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तसेच मुंबई परिसरात हलक्या पावसाची नोंद आहे. केरळमध्ये 1 जूनला मान्सून दाखल होत असतो. मात्र, यंदा लवकरच मान्सूनचे आगमन झाले आहे.
दरम्यान, येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पावसाची शक्यता असून राज्यातील काही भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा होऊन पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने वातावरणातही बदल जाणवणार आहे.
थोडक्यात बातम्या-
“आमच्या बापाची बदनामी होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही”
मोठी बातमी! राणा दाम्पत्यांवर गुन्हा दाखल, ‘हे’ कारण आलं समोर
‘भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण झाली’; नाना पटोलेंचं भाजपवर टीकास्त्र
सुप्रिया सुळेंविषयी केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची माफी, म्हणाले….
“समीर वानखेडे केंद्रीय तपास यंत्रणेचा पोपट, या पोपटावर कुठलीही कारवाई होणार नाही”
Comments are closed.