बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खुशखबर! आता पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त होणार? जाणून घ्या काय आहे कारण

नवी दिल्ली | गेल्या वर्षभरापासून कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं आहे. यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. मे महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या भावात देखील वाढ व्हायला सुरूवात झाली होती. ही वाढ आजपर्यंत सुरूच आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव अलिकडे गगनाला टेकले आहेत. अशातच आता पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमधून ग्राहकांना या महिन्यात दिलासा मिळू शकतो, असं बोललं जात आहे.

तेल विपनन कंपन्यांनी जागतिक तेलाच्या किंमतीत अस्थिरतेचं विश्लेषन करण्यासाठी आज पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किंमती बदलल्या नाहीत. तसेच ओएमसीने पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किंमतीत कपात करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लवकरंच देशांतर्गत इंधनांच्या किंमती खाली येवू शकतात, असं बोललं जात आहे.

दरम्यान, मे महिन्यापासून आतापर्यंत एकूण ३६ वेळा पेट्रोलच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या किंमतीत 34 वेळा वाढ झाली आहे. या वाढीमुळे इंधनाची किंमत आता देशातील बहुतेक पेट्रोल पंपांवर नव्या विक्रमावर पोहोचली असल्याचं दिसत आहे.

जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त देशात पेट्रोलची किंमत शंभरीपार गेली आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 100.56 रुपये प्रती लीटर झाली आहे. तर मुंबईत 106.59 रुपये प्रति लिटर झाली आहे. यासोबतंच दिल्लीत डिझेलची किंमत वाढून 89.62 रुपये प्रति लिटर आणि मुंबईत 97.18 रुपये प्रति लिटर झाली आहे.

थोडक्यात बातम्या –

“मोदी सरकारने देश उध्वस्त करायचं ठरवलं असेल तर काय करणार?”

“ईडीच्या माध्यमातून एकनाथ खडसेंची सुडबुद्धीने आणि राजकीय हेतूने चौकशी सुरू आहे”

…म्हणून भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं – देवेंद्र फडणवीस

“मी एवढी मोठी नाही की, मला संपवण्यासाठी अगदी पंतप्रधानापासून कामाला लागतील”

“टीम देवेंद्र वगैरे असं आमच्याकडे नाही, मी-मी असं चालत नाही”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More