बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खुशखबर! फक्त 1.11 लाखात घरी न्या किया सेल्टाॅस कार

नवी दिल्ली | चारचाकी असणं हे सध्या प्रत्येकाचं स्वप्न आहे. मात्र बजेटमुळे काहींना यात जास्त कालावधी लागतो तर काहींना ते शक्य होत नाही. मात्र चांगल्या बजेटमध्ये तुम्हाला लक्जरी कार घेता येऊ शकेल. एसव्यूव्ही किया सेल्टाॅस या कारला तुम्ही आता 1 लाख 11 हजारांमध्ये घरी नेऊ शकता. ही कार अनेक शानदार फिचर्सने सज्ज आहे. एसव्यूव्ही किया सेल्टाॅसचं एचटीई जी पेट्रोल वेरिएंट हे केवळ 1.11 लाखांमध्ये घरी नेण्यात येणार असून उर्वरित रक्कम ईएमआयद्वारे देखील भरता येईल.

दिल्लीत या कारची एक्स शोरुम किंमत 11,06,229 रुपये आहे. मात्र तुम्ही 1 लाख 11 हजार रुपयांचं डाउन पेमेंट करुन त्यानंर 9,95,229 रुपयांचं कर्ज घ्यावं लागेल. या कर्जेच्या रकमेवर 9.8 टक्के व्याज लागू होईल. म्हणजेच पाच वर्षांमध्ये तुम्हाला 12,62,880 रुपये भरावे लागतील. या रकमेमध्ये 2,67,651 रुपयांच व्याज लागू होत. म्हणजेच दरमहा 21,048 रुपये व्याज लागू होतो.

जर पाच वर्षांचा कालावधीमध्ये तुम्हा उर्वरित रक्कम फेडणं अवघड होत असेल तर तुम्ही हा कालावधी वाढवू शकता. हा कालावधी पाच वर्षांच्या जागी ६ वर्षांचा करु शकता. मात्र त्यानंतर तुम्हाला उर्वरित रक्कम 13,20,264 रुपये द्यावी लागेल. म्हणजेच दरमहा 18,337 ईएमआय द्यावे लागेल. एकूण 3,25,035 रुपये व्याज लागू होईल.

या कारच्या फिचर्समध्ये तुम्हाला 1.54 लीटर जीबीआय टर्बो चार्जड पेट्रोल इंजिन मिळेल. एवढचं नाही तर 1.5 लीटर नॅचरली एस्पीरेटेड इंजिन सुद्धा मिळेल ज्यामध्ये 113बी एच पी पाॅवर आणि 144 न्यानो मीटर टाॅर्क जनरेट करते. ही कार मॅन्यूअल ट्रान्समिशन सोबत सादर करण्यात आली आहे. तसेच ही कार 1 लीटर पेट्रोलमध्ये 16.8 कि.मी. इतकं मायलेज देते.

थोडक्यात बातम्या-

मोठ्या मनाचा माणूस! घरकाम करणाऱ्या तरुणीच्या घरी सांत्वनाला पोहोचले जॅकी श्रॉफ

ममता बॅनर्जींचा भाजपवर बूमरॅंग; दिला ‘हा’ मोठा धक्का

मोठी बातमी! पुण्यापाठोपाठ ‘या’ जिल्ह्यातील शाळा देखील 31 मार्चपर्यंत राहणार बंद

“पुण्यात 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस द्या”

धक्कादायक! एकाच कुटुंबातील 5 जणांनी फाशी घेत संपवलं जीवन

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More