बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! राज्याच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

मुंबई | आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं परिणामी रुग्ण संख्याही घटली. त्यानंतर महाराष्ट्रात नागरिकांना निर्बधांमधून सूट देण्यात आली आहे.

दिवसभरात राज्यात 04 हजार 342 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 04 हजार 755 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.

याशिवाय राज्यात दिवसभरात 55 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात आजपर्यंत 62 लाख 81 हजार 985 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( रिकव्हरी रेट ) 97.04 टक्के एवढा झाला आहे.

दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या विषाणूने डोकं वर काढलं असताना पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोरोना नेमका कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

“आम्हाला विकत घेण्यासाठी भाजपला अनेक अंबानी उभे करावे लागतील”

सिद्धार्थ शुक्लाची अखेरची खास पोस्ट व्हायरल, जाणून घ्या काय आहे कारण!

‘…अन् बॉडीबिल्डरचा फुटला बायसेप’; इंजेक्शन घेऊन बायसेप्स फुगवणाऱ्यांनो वेळीच व्हा सावध, पाहा व्हिडीओ

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी आधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी!

“वडेट्टीवार हा जातीयवादी माणूस”; विनायक मेटेंना वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More