बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गुड न्यूज! कोरोनाच्या स्ट्रेनवर ‘या’ देशाची लस प्रभावी

लंडन | कोरोनाच्या संसर्गाचे थैमान जगभरात सरु असताना दुसरीकडे कोरोनाचे नवीन स्ट्रेन आढळत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. सध्या विकसित केलेल्या कोरोनाच्या लशीदेखील नवीन स्ट्रेनवर प्रभावी ठरणार नसल्याचे म्हटले जात असताना एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. ब्राझीलमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर ‘फायजर-बायोएनटेक’ची लस प्रभावी ठरली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.

वैद्यकीय नियतकालिक ‘न्यु इंग्लंड जर्नल आॅफ मेडिसिन’ मध्ये याबाबतचे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहेत. या संसोधनानुसार, ‘फायजर-बायोएनटेक’च्या लशीने संक्रमक P.1 वेरिएंटच्या स्पाइक प्रोटीनच्या विषाणूविरोधात आपला प्रभाव दाखवला आहे. याआधीच्या कोरोना विषाणूवरही असाच प्रभाव लशीने दाखवला होता.

ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नवीन स्ट्रेनमुळे कोरोना लशीचा प्रभाव कमी होत असल्याचे म्हटले जात होते. फायजरची लस या वेरिएंटवर प्रभावी असल्याचे समोर आले आहे. ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या स्ट्रेनवर लस प्रभावी असताना आता ब्राझीलच्याही स्ट्रेनवर लस प्रभावी असल्याचे समोर आल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, लस प्रभावी असल्याचे संशोधनात आढळून आल्यानंतरही कंपनी आता दोनऐवजी तीन बुस्टर डोसची चाचणी करण्याचे नियोजन करत आहे. त्याशिवाय खास, नव्या वेरिएंटसाठीच लस उत्पादित करण्याचे नियोजन सुरू असल्याची चर्चा आहे. तर, मॉडर्ना लस कंपनीने नव्या वेरिएंटवर प्रभावी ठरणाऱ्या बूस्टर डोस लशीला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये चाचणीसाठी पाठवली आहे. हे बुस्टर डोस या वर्षाच्या अखेरपर्यंत अथवा 2022 या वर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात उपलब्ध होतील, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

थोडक्यात बातम्या –

मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! सचिन वाजेंबाबत हिरेन यांच्या पत्नीने केला धक्कादायक खुलासा

“अध्यक्ष महोदय मी दुखावलो गेलोय, राहुल गांधीना शाळेत पाठवण्यात यावं”

पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्यावर अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांचं मोठं वक्तव्य!

…अन् भरबैठकीत नाना पटोले संतापले; ‘या’ मुद्द्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीवर व्यक्त केली नाराजी

सख्खे भाऊ पक्के वैरी; आई-वडिलांसमोरच लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More