बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खुशखबर! पुण्यात ‘इतक्या’ रुपयांमध्ये करा एसी बसने प्रवास

पुणे | पुणे महापालिकेने फक्त दहा रुपयांत दिवसभरासाठी ‘एसी’ बस प्रवास योजना आणली आहे. या योजनेला ‘पुण्यदशम’ असे नाव देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात दोन जुलैपासून आकर्षक गुलाबी रंगसंगतीच्या पन्नास बसेस पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि पेठांमध्ये प्रवासासाठी देण्यात येणार आहेत.

या योजनेंतर्गत दिवसभरामध्ये दहा रुपयात वातानुकुलीत बसमधून कितीही वेळा प्रवास करता येणार आहे. सीएनजीवर चालणा-या या मिडी बसची आसन क्षमता 24 आहे. छोटी बस असल्याने मध्यवस्तीतील लहान रस्त्यांवरुनही ही बस धावू शकणार आहे.

महापालिकेच्या 2020-21 च्या अर्थसंकल्पामध्ये ही योजना मांडण्यात आली होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. शनिवारी दुपारी एक वाजता आर्यन पार्किंग, महात्मा फुले मंडई या ठीकाणी उद्घाटन होणार आहे.

दरम्यान, महात्मा फुले मंडई येथे बसचा लोकाअर्पण सोहळा होणार असून शहरातील पेठांच्या नऊ मार्गांवर नागरिकांना अवघ्या दहा रुपयात प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे 10 रुपयांचे तिकीट 24 तास चालणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“…मग ईडीने देवेंद्र फडणवीसांची चौकशी का करु नये?”

कोरोनामुक्त झालेल्या महिलेला उद्भवली ही समस्या; डॉक्टरही झाले हैराण

“तुमची गाडी पेट्रोल, डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं”

‘भास्कर जाधव यांनीच आईवरुन शिवी दिली’; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

“काल त्यांनी प्रति विधानसभा मांडली, उद्या प्रति संविधानही मांडतील”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More