खुशखबर! देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

नवी दिल्ली | महागाईच्या झळा सर्वसामान्यांना बसतच होत्या. अशावेळी रशिया-युक्रेन(Russia-Ukraine) युद्ध सुरु झालं आणि पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले. त्यानंतर ते वाढलेले दर स्थिर राहिले असले तरी सर्वसामान्यांसाठी ते दिलासादायक नव्हते.

अशावेळी आता पेट्रोल-डिझेलचा दर कमी होणार असल्याची चर्चा सुरु आहे. तज्ज्ञांच्या मते 5 डिसेंबर नंतर तेलाच्या किंमतीत पाच रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील असे दावे करण्यात आले होते. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर(Gujarat Elections) देखील सरकार हे गिफ्ट देऊ शकत असं म्हटलं जात आहे.

चीनच्या (China) झीरो कोविड पाॅलिसीनुसार उद्योगांवर परिणाम झाला आहे. याच कारणाने क्रूडऑईलच्या मागणीत घट झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात क्रूड ऑइलच्या मागणीत 7% घट दिसून आली आहे. त्यामुळे देखील तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

तसेच नुकताच आंतरराष्ट्रीय दर्जाची मोठी अशी G-7 परिषद पार पडली. त्यावेळी सर्व देशांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रशियन तेलावर प्रति बॅरेल $60 ची किंमत लादण्यास संमती दिली आहे. त्यांची अंमलबजावणी (Implementation) 5 डिसेंबरपासून करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑइलची मागणी कमी झाली आहे. अशा परिस्थीतीत इंडियन ऑइल, बीपीसीएल-एचपीसीएल (BPCL-HPCL) तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात करात करतील अशी अपेक्षा आहे.

त्यामुळे आता वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. लवकरच पेट्रोलच्या किंमतीत घट होणार असल्याने बजेट स्थिरावण्याचे संकेत दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More