बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चांगलं केलं की चांगलंच होतं, आता वेळच सर्व गोष्टींना उत्तर देईन – सोनू सूद

मुंबई | भारतात अनेक लोकं कर चुकतात. त्यामुळे हा भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील एक मोठा अडथळा आहे. करचूकवेगीरीच्या प्रकरणांना आळा घालण्याचं काम सक्तवसूली संचनालय करतं. देशातील ईडीच्या कारवाया राजकीयदृष्या प्रेरित असतात असा ईडीवर आरोप केला जातो. त्यातच आता ईडीची नजर गरीबांचा मसीहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनू सूदवर पडली आहे. सोनू सूद यांच्या मालमत्तांची तपासणी सध्या ईडीने केली आहे. त्यावर सोनू सूदने प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या अभिनयाने रसीकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता सोनू सूद चांगलाच अडचणीत सापडला आहे. देशात कोरोना महामारीचा प्रभाव जसजसा वाढू लागला, तसंतसं सोनू सूद यांचं सामाजिक कार्य सुद्धा वाढत गेलं. मोठ्या प्रमाणात पैसा वापरून सोनू सूदने देशातील लोकांची मदत केली. परिणामी सोनू सूद यांच्यावर ईडीने करचुकवेगीरी आणि परदेशातून पैसा आणताना गडबड केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. सोनू सूदने ईडीच्या कार्यवाहीवर बोलताना चांगल केलं की चांगलंच होतं, आपण फक्त आपलं कार्य करायचं बाकी वेळ उत्तर देईल, असं म्हटलं आहे.

सक्तवसूली संचनालयाने सोनू सूद यांच्या मालमत्तांची दोन दिवस तपासणी केली. सोनू सूदने त्याच्या संस्थाच्या माध्यमातून 20 कोटी कर चूकवला आहे, अशी माहिती ईडीने माध्यमांना दिली आहे. ईडीच्या या स्पष्टीकरणानंतर देशातील राजकारण रंगलं दिसतंय. सत्ताधारी भाजप आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. सोनू सूद यांनी सरकारचं ऐकलं नाही म्हणून त्यांच्यावर कार्यवाही झाली असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

दरम्यान, देशातील प्रत्येक व्यक्तीची सेवा करण्यासाठी मी कायम काम करत राहीन. माझ्या संस्थेतील प्रत्येक रूपया हा सामान्य माणसांच्या कल्याणासाठी खर्च होणार आहे, असं सोनू सूद यांनी ईडीच्या कार्यवाहीनंतर बोलताना सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या 

“माझी लढाई एक प्रकारची क्रांती, आता शांत बसणार नाही”

धावबाद होताच फलंदाजाने रागाने फेकली बॅट अन्…; पाहा व्हिडीओ

“कन्यादान करायला मुलगी वस्तू आहे का?”; कन्यादान शब्दावर आलियाचा आक्षेप

दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More