बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर!

नवी दिल्ली | भारत सरकारने गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याला अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. गेल्या वर्षभरात तीन वेळा महागाई भत्ता मिळण्यापासून केंद्रीय कर्मचारी वंचित राहिले होते. त्यानंतर नुकतंच सरकारने महागाई भत्ता वाढवला. त्यातच आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे. महागाई भत्त्यानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणखी एका भत्त्यात वाढ केली आहे.

केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ करून 28 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने घरभाडे भत्त्यात देखील वाढ केली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दुप्पट फायदा होणार आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली असली तरी रेल्वे कर्मचारी आणि लष्करातील जवानांना याचा फायदा होणार नाही, त्यासाठी स्वतंत्र आदेश लागू करण्यात येणार असल्याचं केंद्राने सांगितलं आहे.

घरभाडे भत्ता 25 टक्यापर्यंत वाढ झाल्यानं एचआरएमध्ये (घरभाडे भत्ता) बदल केल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 27 टक्के, 18 टक्के, 9 टक्के या दरानेच एचआरए देण्यात येणार आहे. या पुर्वी कर्मचाऱ्यांना 24, 18 आणि 9 टक्के या दराने एचआरए देण्यात येत होता. त्यात आता बदल करण्यात आले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने महागाई भत्ता तब्बल 11 टक्क्यांनी वाढवला आहे. केंद्र सरकारचा हा आदेश 1 जुलैपासून लागू करण्यात आला आहे. महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात वाढ केल्यानं आता सरकारी कर्मचारी मालामाल झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

रश्मी शुक्ला यांचा मोठा गौप्यस्फोट; ‘त्यावेळी सरकारी आदेशाने…’

मुंबई लोकल सामान्यांसाठी सुरू होणार?, राजेश टोपेंचं सुचक वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींची टि्वटरवर कमाल; फॉलोअर्सची संख्या 7 कोटींवर

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

मुंबईकरांनी करुन दाखवलं! आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More