बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ दिवशी लाॅन्च होणार गुगल आणि जीयोचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन

नवी दिल्ली | रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44व्या वार्षिक महासभेमध्ये रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी भारतात जीयो फोन नेक्स्टची घोषणा केली आहे. जीयो आणि गुगलच्या स्वस्त स्मार्टफोनची प्रतीक्षा अनेक दिवसांपासून केली जात होती. गेल्यावर्षी घोषणा केल्यापासून भारतीय ग्राहक या फोनची आतुरतेने वाट बघत होते. आज रिलायन्स जिओने भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच होण्याची घोषणा केली.

आज दुपारी दोन वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि अन्य ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांमधून ही सभा पार पडली आहे. या सभेच्या सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांच्यासह आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि नीता अंबानी यांनी कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. तसंच या सभेत त्यांनी काही महत्त्वपूर्ण घोषणाही केल्या आहे.

जियो फोन नेक्स्ट हा फक्त भारतातीलच नव्हे, तर जगात सर्वात स्वस्त फोन असेल, असा दावा वार्षिक सभेदरम्यान या फोनची घोषणा करताना मुकेश अंबानी यांनी केला आहे. भारताला टूजी मुक्त करायचं असेल, तर सर्वांना परवडेल अशा खऱ्या अर्थाने स्वस्त स्मार्टफोनची गरज आहे. त्या आधारावर जिओ आणि गुगल यानी मिळून जिओ फोन नेक्स्ट डेव्हलप केला असून भारतात तो लाँच केला जाणार आहे, असं मुकेश अंबानी यावेळी म्हणाले.

दरम्यान, येत्या गणेश चतुर्थीला 10 सप्टेंबर रोजी हा फोन लाँच होणार आहे. त्यामुळे लवकरच देशाला टूजी मुक्त करता येणं शक्य होणार असल्याचं मुकेश अंबानी यावेळी म्हणाले. येत्या काही दिवसांत या फोनची किंमत देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये व्हॉइस असिस्टन्स, ऑटोमॅटिक रीड अलाऊड, स्मार्ट कॅमेरा असे फीचर्स असणार आहेत.

 

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रातील एकमेव आमदार! कोरोना काळात केलेल्या कामामुळे निलेश लंकेचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ ने सन्मान

आठ वर्षीय चिमुकलीनं स्वर्गाचा पत्ता टाकत लिहिलं दिवंगत वडिलांना पत्र!

“नरेंद्र मोदींची आता झोळी घेऊन जाण्याची वेळ आली”

‘या’ मंदिरात दर्शनासाठी लागणार लसीकरण प्रमाणपत्र!

पेरण्या खोळंबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा; ‘या’ जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More