Top News तंत्रज्ञान

गुगल त्यांची सर्वात प्रसिद्ध असलेली ‘ही’ सुविधा बंद करणार…!

नवी दिल्ली | तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी गुगल १ ऑक्टोबरपासून ‘गुगल प्ले म्युझिक’ सुविधा बंद करणार आहे, अशी गुगलने घोषणा केली आहे. सर्वात पहिली ही सुविधा न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इत्यादी देशात सप्टेंबर महिन्यानंतर बंद होणार आहे.

या देशानंतर अन्य भागातील सर्व ठिकाणी ही सुविधा ऑक्टोबर महिन्यापासून बंद करणार आहे. यानंतर ‘गुगल प्ले म्युझिक’ सुविधा वापरणाऱ्या सर्वांनी १ ऑक्टोबरआधी ऍपवरील आपली सर्व माहिती सुरक्षित करा. सप्टेंबर महिन्यानंतर या सुविधेसाठी आम्ही कोणतेही पेमेंट स्वीकारणार नाही, असं गुगलने स्पष्ट केलंय.

वापरकर्ते हे ऍप प्ले स्टोअरवरूनही वापरू शकणार नाही. The Verge ला दिलेल्या अहवालानुसार, गुगल आता केवळ ‘यु ट्युब म्युझिक’ ही सुविधा चालू ठेवणार आहे. गुगलकडून ‘गुगल प्ले म्युझिक’ ऐवजी ‘यु ट्युब म्युझिक’ सुविधा उपलब्ध करून देणार आहे. कंपनीने सांगितले की, ‘यु ट्युब म्युझिक’ हे वापरायला ‘गुगल प्ले म्युझिक’ प्रमाणेच अतिशय सोपे आहे.

गुगलच्या माहितीनुसार त्यांनी बऱ्याच वेळा ‘गुगल प्ले म्युझिक’ बंद करण्याची नोटीस जारी केली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत ही सुविधा बंद होत नाही, तोपर्यंत वापरकर्ते ही सुविधा वापरू शकतात. तुम्ही जर अँड्रॉइड १० सुविधा असलेला नविन मोबाईल घेतला तर त्यात ‘गुगल प्ले म्युझिक’ ऐवजी ‘यु ट्युब म्युझिक’ हे ऍप आधीच इन्स्टॉल केलेले मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख होतोय पाहून शरद पवार संतापले अन्…..

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह

संरक्षण खातं बनणार आत्मनिर्भर; राजनाथ सिंह यांनी केली मोठी घोषणा…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या