बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गुगलचा कर्मचाऱ्यांना झटका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं गेल्या दीड वर्षांपासून जगभर थैमान घातलं आहे. कोरोना रोगावर उपचार म्हणून सध्यातरी लसीकरण हा एकमेव उपाय जगामध्ये उपलब्ध आहे. लसीकरण करून घेण्यावर सरकार, कंपन्या, महाविद्यालयं सर्वजण प्रयत्न करत आहेत. अशातच काहीजण लस घेण्यास उत्सुक नसल्यानं त्यांच्यासाठी सरकार आणि कंपन्यांनी कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे.

सार्वजनिक ठिकाणी फिरण्यासाठी सध्या कोरोना लसीकरण प्रमाणपत्र गरजेचं करण्यात आलं आहे. अशातच जगातील सर्वात मोठी कंपनी गुगलनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जे कर्मचारी लस घेणार नाहीत त्यांचा पगार कापण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. गुगलच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

गुगलनं आपल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करून घेण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. पहिल्यांदा लसीकरण पुर्ण करण्यासाठी 3 डिसेंबर ही तारीख देण्यात आली होती. त्यानंतर कंपनीनं कर्मचाऱ्यांना दिलासा देत 18 जानेवारी पर्यंत आपलं लसीकरण प्रमाणपत्र  जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जे कर्मचारी लसीकरण प्रमाणपत्र जमा करणार नाहीत त्यांना पगार कपातीसोबतच नोकरीवरून काढून टाकण्याची सुद्धा शक्यता आहे.

दरम्यान, गुगलनं आपल्या कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत अधिक सतर्क राहाण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी आता गुगलप्रमाणं इतर कंपन्याही आपापल्या कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी नियमावलीनूसार वागण्याच्या सुचना जारी करू शकतात. लसीकरण हे सध्यातरी कोरोनाविरूद्ध लढण्याचं एक मोठं आणि महत्त्वाचं साधन आहे.

थोडक्यात बातम्या-

‘हे लोकशाहीत चालतं का?’, अजित पवारांनी राज्यपालांना सुनावलं

…अन् यशपाल शर्माने मद्रासचा राग मँचेस्टरमध्ये काढला, पाहा व्हिडीओ

आता श्रेयवादाची लढाई सुरू?, शिवाजीराव आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला

बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“राज साहेब माझं काय चुकलं?”, पुण्यापाठोपाठ औरंगाबाद मनसेमधील अस्वस्थता उघड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More