बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माई, तुझ्या प्रेमाला…’, गुगलनं अनोख्या पद्धतीनं वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली | अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं मंगळवारी निधन झालं आहे. हद्यविकाराच्या झटक्याने मंगळवारी रात्री 8 वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इतकचं नाही तर जगातील टॉप सर्च इंजिन असलेल्या गुगलनेही (Google) सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.

गुगलने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून “तुझ्या प्रेमाला बंधन नाही, माई” असं मराठीतून ट्विट केलं आहे. यासोबतचं तू त्या प्रत्येकासाठी उत्तर होती जे घर आणि आशेच्या शोधात होते. असंही या ट्विटमध्ये म्हटलं आहे. गुगलने यासोबतच एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये सिंधुताईंची सर्व माहिती दिलेली आहे.

गुगलने शेअर केलेल्या टविटमध्ये सिंधुताईंसाठी गौरवोद्गार काढण्यात आले आहेत. चिल्ड्रेन म्हणजेच अपत्य या रकान्यापुढे 4 बायोलॉजिकल आणि 15000 दत्तक असं म्हटलं आहे. याला हायलाईटही करण्यात आलं आहे. सिंधुताईंनी अनेक अनाथ मुलांना दत्तक घेतलं होतं. त्यांनी या मुलांना संभाळण्यासाठी तसेच शिक्षणासाठी अनेक संस्थादेखील सुरु केल्या आहेत.

दरम्यान, सिंधुताई यांच्यावर बुधवारी ठोसरबाग दफनभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारोंच्या उपस्थितीत सिंधुताईंवर वाजता महानुभव पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी येऊन सिंधुताईंचे अखेरचे दर्शन घेतले आहे. शासकिय इतमामात सिंधुताई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

पाहा ट्विट-

थो़डक्यात बातम्या-

‘त्या लोकांना पंतप्रधानांच्या गाडीपर्यंत कोणी पोहचवलं?’, स्मृती इराणींचे काँग्रेसवर गंभीर आरोप

“… मी जिवंत पोहचू शकलो, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा”

धक्कादायक! संजय राऊतांच्या घरी कोरोनाचा शिरकाव, चार जणांना कोरोनाची लागण

पुढील चार दिवस जोरदार पाऊस; ‘या’ भागात अलर्ट जारी

मोठी बातमी! राज्यातील सर्व महाविद्यालय ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More