Top News

‘गुगल भारतात इतक्या हजार कोटींची गुंतवणूक करणार’; सुंदर पिचई यांनी केली मोठी घोषणा

नवी दिल्ली | गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी गुगल भारतामध्ये डिजीटलायझेशनसाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. पुढील पाच ते सात वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार असल्याचं पिचई यांनी स्पष्ट केलंय.

पिचई यांनी आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यानंतर पिचई यांनी एका ब्लॉग पोस्टमधून ही घोषणा केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

आम्ही आज गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत 10 बिलीयन डॉलरच्या (75 हजार कोटी) गुंतवणूकीची घोषणा केली. भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत. आम्हाला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडियाच्या व्हिजनमुळे पाठिंबा मिळाला त्यासाठी त्यांचे धन्यवाद,  असं ट्विट पिचई यांनी केलं आहे.

गुगलकडून करण्यात येणारी गुंतवणूक ऑपरेशन्स व डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधा यांच्याशी संबंधित असणार आहे, असंही पिचई यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी, बघू ते मुलाखत देतात का?- संजय राऊत

धक्कादायक! भाजप मंत्र्याच्या मुलाला रोखल्यामुळे पोलिस महिलेला द्यावा लागला राजीनामा

महत्वाच्या बातम्या-

पुणेकरांनो आतातरी घरी बसा, आयसीयू, ऑक्सिजन अन् बेडही नाहीत!

‘नया है वह’ म्हणत फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका, संजय राऊतांचं फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर

खळबळजनक! भाजप आमदाराचा फास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या