बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फाडफाड इंग्रजी शिकायचीय?, मग Google करेल तुमची मदत!

नवी दिल्ली | आजच्या युगात प्रत्येकाला धडाधड इंग्रजी बोलण्याची इच्छा आहे. मात्र काहींना आत्मविश्वास कमी पडतो, तर काहींना शब्दसाठा. अशातच आता गुगलने नवीन फीचर लॉन्च केलं आहे. काही दिवसांपूर्वी गुगलने पिक्सेल कार्यक्रम आयोजित केलं होतं. या कार्यक्रमाच्या वेळेस गुगलने पिक्सेल सिक्स मालिकेतील नवीन स्मार्टफोन लॉन्च केले. त्यानंतर गुगल डाॅक्स आणि डीमेल मध्ये देखील महत्वाचे अपडेट केले. यादरम्यान वापरकर्त्यांना गुगल सर्चद्वारे इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे, अशा लोकांसाठी नवीन फिचर बाबतची माहिती देण्यात आली आहे.

गुगलने एक पोस्ट जारी केली आहे. या पोस्टमध्ये कंपनीने फिचर बद्दलची माहिती दिली असून नवीन फिचर लोकांना कशी मदत करेल याबाबत देखील सांगितले आहेत. या वैशिष्ट्याचा वापर करून लोक वेगवेगळे इंग्रजी शब्दांबद्दल जाणून घेतील. तसेच इंग्रजी बद्दलची उत्सुकता देखील वाढेल. नवीन वैशिष्ट्यामुळे वापर करते दररोज सूचनांच्या स्वरुपात नवीन इंग्रजी शब्द शिकू शकतील.

या गोष्टीचा उपभोग घेण्यासाठी वापरकर्त्यांना सबस्क्राईब करणे आवश्यक असेल. गूगल सर्चमध्ये हे फंक्शन्स सबस्क्राईब करणे खूप सोपं असून सर्व वापरकर्त्यांना साइन अप करण्यासाठी गुगल सर्चमध्ये कोणत्याही इंग्रजी शब्दाची परिभाषा पहावी लागेल. तसेच वरती उजव्या कोपर्‍यातील बेल आयकॉनवर क्लिक करावे लागेल.

दरम्यान, गुगल हे वैशिष्टे फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध करून दिले आहे. तसेच इंग्रजी शिकणारे आणि तुटक इंग्रजी बोलणारे दोघांसाठी सारखे शब्द तयार केलेले असून लवकरच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कठीण इंग्रजी शिकू शकतात.

थोडक्यात बातम्या-

लेकाची कामगिरी पाहून बाबर आझमच्या वडिलांना अश्रू अनावर; पाहा व्हिडीओ

पाकिस्तानविरूद्ध भारताचा पराभव अन् सांगलीत टीव्ही फोडला; पाहा व्हिडीओ

..अन् अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी भागवत कराड उतरले डाॅक्टरांच्या भूमिकेत

‘पाकिस्तानविरुद्ध आपण कधी ना कधी हरणार’, धोनीची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली

समीर वानखेडेंवरील आरोपांच्या चौकशीला सुरूवात; वानखेडे दिल्लीला जाण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More