बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् अशाप्रकारे कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

सातारा | तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत रॅली काढणारा गुंड गजा मारणे अटकेच्या भीतीने फरार झाला होता. नियोजनपूर्वक तळोजा कारागृह ते कोथरुडपर्यंत त्याने आपली दहशत पुन्हा पसरवण्यासाठी ही रॅली काढली होती. मात्र या रॅलीदरम्यान त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे तो फरार झाला होता.

पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलिसांच्या हातावर तुरी देत गजा मारणेने वडगाव मावळच्या न्यायालयात जाऊन अटकपुर्व जामीन मिळवला होता. तेव्हापासून पोलीस गजा मारणेच्या मागावर होते. गजा मारणे फरार झाला मात्र जास्त दिवस तो पोलिसांना गुंगारा देऊ शकला नाही. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात मेढा गावमध्ये गजा मारणेला पोलिसांनी अटक करत बेड्या ठोकल्या आहेत.

साताऱ्यामध्ये मेढा या गावात गजा मारणे फिरताना त्याला सहायक पोलिस निरीक्षक अमोल जाधव आणि त्यांच्या टीमने अटक केल्याची माहिती समजत आहे. तळोजा कारागृहातून सुटल्यावर 500 गाड्यांच्या ताफ्यासह मुंबई-पुणे महामार्गावर धुडगूस घातला होता. तर वारजे पोलिस ठाण्यातही गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, गजा मारणेच्या आधी त्याचा परस्परविरोधातील मोहोळ टोळीतील शरद मोहोळही बाहेर आला आहे. त्यामुळे आपली दहशत वाढवण्यासाठी दोन्ही टोळीतील वर्चस्वाच्या लढाई होण्याची शक्यता आहे. यादरम्यान सामान्य नागरिकांना काही त्रास होणार नाही याची काळजी पोलिसांना घ्यावी लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

पाकिस्तानात हिंदू कुटुंबावर जीवघेणा हल्ला, 5 जणांचा जागीच मृत्यू

“आमदारकीसाठी नव्हे तर शेतकऱ्याला योग्य दाम मिळावा म्हणून आंदोलन”

‘देवदूतच ठरला यमदूत’! पैसे नसल्याने डॉक्टरांनी चिमुरडीचं शिवलं नाही पोट अन्…

राज्यातील कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

धक्कादायक! आरोग्य अधिकाऱ्याने घेतली ‘कोरोना’ची लस अन् पाच दिवसातच…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More