Top News क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात पुन्हा गुंडांची दहशत, तरुणावर झालेला हल्ला सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडीओ

Photo Credit - Facebook/ @news18pune

पुणे |  पुणे शहरातील हडपसर भागात एका युवकावर काही गुंडांनी तलवारीने आणि कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तरुणावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे  हडपसर परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे.

या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी झालेल्या पीडित तरुणाचं नाव रोहन इंगळे असून त्याच्यावर शहरातील काही गुंडाच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला आहे. यावेळी रोहण आपला जीव वाचवण्यासाठी जवळच्या एका एटीएममध्ये शिरला होता. परंतु या गुंडाच्या टोळक्याने रोहणला एटीएममधून बाहेर ओढून त्याच्यावर तलवार आणि कोयत्याने वार केले आहेत.

त्यावेळी तिथे उपस्थित असणारा आणखी एका तरुण रोहणला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पण गुंडाच्या टोळक्यातील एका युवकाने त्यालाही तलवारीचा धाक दाखवला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण दोन दिवसांपूर्वी 18 फेब्रुवारी रोजी घडलं आहे. आता या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणात हडपसर पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच जखमी रोहन इंगळेवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या – 

राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, मंत्रिमंडळातील ‘या’ नेत्याने दिले संकेत!

“आज महाराज असते तर धनंजय मुंडे, मेहबूब शेख, संजय राठोड यांचा कडेलोट केला असता”

ब्रेकिंग न्यूज- पुण्यासह इतर महापालिका शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढवणार

मी कंबर हालवत बसत नाही तर सरळ हाडं तोडते- कंगणा राणाव

15 कोटी म्हणजे किती रे भाऊ?, स्वतःवर लागलेली बोलू ऐकून त्याला पडला प्रश्न!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या