बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘घराणेशाही नसेल तर…’; राम गोपाल वर्माचा करण जोहरला पाठिंबा

मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा समोर आला. यावर  दिग्दर्शक राम गोपाल वर्माने भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी करण जोहरला पाठिंबा दर्शविला आहे.

करण जोहरवर ज्याप्रकारे आरोप केले जात आहेत, याचा अर्थ लोकांनी फिल्म इंडस्ट्रीला समजूनच घेतलं नाही, असं राम गोपाल वर्माने म्हटलं आहे. तसेच जरी करण जोहरला सुशांतशी काही समस्या होती असं समजलो तरी कोणासोबत काम करायचं आणि कोणासोबत नाही याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य करणला आहे, असंही राम गोपाल वर्माने सांगितलं आहे.

12 वर्षे इंडस्ट्रीत राहिल्यानंतर, पैसा आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर जर सुशांत इंडस्ट्रीत एकटं वाटल्याने आत्महत्या करू शकतो. तर त्याच्याइतकंही यश संपादन करू न शकणाऱ्या 100 कलाकारांची आत्महत्याही योग्य ठरू शकते. जे काही झालं त्यासाठी करण जोहरवर आरोप करणं म्हणजे तुम्ही अजून फिल्म इंडस्ट्रीला नीट समजू शकले नाही, असं राम गोपाल वर्माने म्हटलंय.

घराणेशाही नसेल तर समाजव्यवस्था ढासळेल कारण कुटुंबातील प्रेमच समाजाचा आधार आहे. ज्याप्रकारे तुम्ही दुसऱ्या पत्नीवर जास्त प्रेम करू शकत नाही आणि ज्याप्रकारे तुम्ही दुसऱ्यांच्या मुलांना आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम नाही करू शकत, असं ट्विट राम गोपाल वर्माने केलंय.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी ‘या’ चार जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल

भाजप नेते हरिभाऊ जावळेंच्या निधनाबद्दल एकनाथ खडसेंचा धक्कादायक गौप्यस्फोट

महत्वाच्या बातम्या-

“एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा आम्हाला अभिमान”

“सीमेवर जे घडलं, त्यासाठी नेहरू, इंदिरा गांधींना किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही”

“झोपाळ्यावर बसून झालं, आता चीनला लाल आँखे दाखवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More