बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना दुसऱ्यांच्या लग्नात नाचायची सवय आहे”

मुंबई | पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक मोठ्या धामधुमीत पार पडल्यानंतर आता निकाल जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. येथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने एकहाती विजय मिळवला आहे. या निकालावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बाहेरच्या राज्यांच्या राजकीय घडामोडींवर बोलण्याइतपत त्यांची उंची नाही. मुळात प्रचाराला जाण्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब आजारी असल्यामुळे प्रचाराला जावू शकले नाहीत. शिवसेनेचे नेतेही तिथे उमेदवार उभे करणार, असं म्हणाले होते. पण ते उमेदवार उभे करु शकले नाहीत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्याच्या लग्नामध्ये नाचण्याची आधीपासून सवय आहे, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:चं बघावं. त्यांना भाजपची चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुमचा पक्ष पुढे राहणार का? पुढे ते कोणत्या पक्षात विलीन होणार का? तुमच्या पक्षाचा अजेंडा काय? तुम्ही काय काम करणार आहात? यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. इतक्या लांब पश्चिम बंगालपर्यंत जाण्याची त्यांची कुवत नाही, अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केलीये.

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पंढरपूरच्या निकालानं धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे. यांचा विजय झाला आहे. या निकालावरून देखील पडळकर यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलंय. पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला करेक्ट कार्यक्रम?. नुतन आमदार समाधान आवताडेंचं सात हजार मतांनी दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन. जय मल्हार, असं ट्विट करत पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना डिवचलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

कसा झाला समाधान आवताडे यांचा विजय?, पाहा 38 फेऱ्यांमध्ये कशी कशी मिळाली मतं

“संज्या, तू स्वत: कधी निवडून येणार ते आधी सांग”

“तुम्ही फक्त जामिनावर सुटलात, जोरात बोलू नका नाहीतर महागात पडेल”

समाधान अवताडेंचा विजय निश्चित होताच देवेंद्र फडणवीसांचा ‘हा’ व्हिडीओ तुफान व्हायरल!

मोठी बातमी! पंढरपुरात महाविकास आघाडीचा धुव्वा, भाजपचे समाधान आवताडे विजयी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More