बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार”

मुंबई | ओबीसींच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. यातच याता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी ओबींसींच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरुन आता त्यांच्यावर टीकांचा भडीमार होत आहे.

ओबीसींवर माझा फार काही विश्वास नाही, कारण जेव्हा मंडळ आयोग आलं तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं, असा घणाघात आव्हाडांनी ओबीसींवर केलेला पहायला मिळाला. यावरुन आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार आहेत, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या मनात ओबीसी समाजाबद्दल इतका राग का, यासाठीच ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवंल होतं का? असाही सवाल पडळकरांनी विचारला आहे.

आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला होता. वंचितांच्या आरक्षणाला नाक मुरडली. शेकडो ओबीसींनी स्वतःला पेटवून घेतलं होते. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला?, असा खोचक प्रश्न विचारत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

ओबींसींबाबत जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

धक्कादायक! लस घेतलेल्या ‘इतक्या’ टक्के नागरिकांना कोरोनाची लागण

नितेश राणेंना मोठा दिलासा; तुर्तास अटक होणार नाही

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

मुंबईत लागणार लॉकडाऊन?; आयुक्तांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More