बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ज्याला दोनवेळा आमच्या दत्तामामानं पाडलं तो आता…’; अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांना टोला

पंढरपूर | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेेते अजित पवार यांनी गुरुवारी पंढरपूरात दिवसभर प्रचारसभा घेतल्या. यावेळी प्रचारसभेत केलेल्या भाषणात अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. अजित पवारांनी भाषणात गोपीचंद पडळकर आणि हर्षवर्धन पाटील यांचा जोरदार समाचार घेतला आहे.

ज्याला दोनवेळा आमच्या दत्तामामानं पाडलं तो आता मतं मागायला आलाय. 20-20 वर्ष मंत्री असूनही लोकांची काम केली नाहीत म्हणून तुम्हाला तुमच्या घरच्या लोकांनी पाडलं आणि आता बाहेर जाऊन तुम्ही काय सांगणार कोणाला मत द्या?, असा टोला अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटलांना लगावला.

सध्या एक नेता तुमच्याकडं जोरदार भाषणं करत फिरतोय, त्यांचे डिपॉझिट सुद्धा त्याला बारामतीत वाचवता आलं नव्हतं आणि आता हा कोणत्या तोंडानं मतं मागतोय? ज्याला स्वतःचं डिपॉझिट वाचवता आलं नाही तो तुम्हाला सल्ले देतोय, असं म्हणत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांची खिल्ली उडवली.

दरम्यान, आपलं तसं नाही, आपल्याकडं प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आहेत. आपल्यामागे चुलता उभा आहे. आपल्या मागं शरद पवार आहेत आणि शेवटपर्यंत राहणार हे लक्षात ठेवा, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांना विजयी करण्याचं आवाहन केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर लसींचा तुटवडा जाणवला नसता- उदयनराजे भोसले

‘कोरोना लढ्यात राजकारण नकाे, राजकीय पक्षांना समज द्या’; उद्धव ठाकरेंची मोदींना विनंती

‘किमान संकट काळात तरी राजकारण करू नका’; रोहित पवारांनी भाजप नेत्यांना फटकारलं

काळजी घ्या! कोरोनाची ही नवी लक्षणं आली समोर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्या ‘या’ मागण्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More